भाविक हो देवावर श्रद्धा असावी. त्यापलीकडे मी म्हणतो की देवावर नितांत श्रद्धा आपली असावी परंतु अंधश्रद्धा नसावी.
काल पासून खानदेश मधील काही भागात हा मेसेज फार फिरत आहे. काहींनी टर स्टेट्स ठेवले आहेत. नंदी दुध पीत आहे. असे घडत असेल तर त्या माघे काही वैज्ञाणिक कारण असू शकते. त्याचा आपण शोध घेतला पाहिजे. नाकी त्याचा अपप्रचार केला पहिजे.
आज आपण याचा विचार करा की माझ्या गावातील मंदिर सुंदर कसे होईल. आपल्या मंदिरात स्वछता कशी राहील. आपल्या मंदिराच्या आसपासचा परिसर कसा सुंदर होईल. आपल्या जुन्या मंदिरांना नवीन कसे बनवता येईल. मंदिराच्या परिसरात ग्रंथालय सुरु कसे होईल. असंख्ये पुस्तके त्या ठिकाणी वाचण्यासाठी ठेवा. कारण आपल्या धर्माचे प्रतीबिंब आपल्या धर्म ग्रंथात दिसते.
कारण पुस्तकाने मस्तक सुधारते
आणि
जे मस्तक सुधारलेले असते
ते कुणापुढे ही नट मस्तक होत नाही.
हा आमचा इतिहास आहे.
असे शिवाजी महाराजांच्या विचारातून आपणास कळते.
भाविकांनी तर महादेवाच्या पिंडेला तसेच नागाला ही दुध पाजले. वाचक हो आपण जर नेहमी असेच माणू तर आपले विचार किती महान आहेत याचे आपणास कळेल. आपणास सत्यता तपासता आली पाहिजे. कारण वैज्ञाणिक हे अशाच विचारातून तयार होतात. तर शोध घ्या की नंदीदेव नागदेव व महादेवपिंड दुध व पाणी का पीत आहे ?
जर आपण वरील विडीओ बघत असाल तर समजेल की नंदीच्या मुखात चमची पूर्ण जात आहे कदाचित आतील भाग पोकळ असावा व त्या मुखाच्या फटीतून दुध आत जात असावे. व दुसऱ्या विडीओ मध्ये तांबे व पितळाचे देव आहेत याचा प्रत्येय आपणास या अगोदर भूतकाळात आला आहे. तर याचा शोध घ्या की नंदी दुध क पीत आहे व ते भाविकांन समोर मांडा.....
वरील विषयावरती माझे हे वैयक्तीक मत आहे. माझ्या विचारांशी कुणी सहमत नसेल तर त्यास माझा कुठलाही विरोध नाही.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.