वधले छत्रपती
दिल्ली हि जुकली असती
पाहून कराड वार्या मधी
मला सगळ्यांना सांगावेशे वाटते कि मराठी हि फक्त भाषा नाही, तर ती एक जीवन शैली आहे. त्यात सर्वांचा समावेश होतो. मराठी हि एक जीवन शैली असल्याकारणामुळे बरेच लोक आत्ता मराठी विचार धारण करतांना दिसत आहेत व तसेच विचारांच्या सोबत मराठी आचरण करतांना दिसत आहेत. महाराष्ट्र हा एक भूभाग नसून तो आम्हास माते समान वाटणारा जिवंत व मूर्तिमंत दैव आहे. खर्या व जातिवंत मराठी माणूस आजही सर्वसमावेषक विचार करतो व तसा वागतो हि. पण बऱ्याच लोकांना मराठी हि एक संकुचित वाणी वाटते. तर त्यांना सांगाव्यास वाटते कि आज महाराष्ट्र हा सर्वसमावेषक विचार, धर्म, पंत, वाणी, पोशाख व वेंजन घेऊन पुढे चालत आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र या चांगल्या विचारांची पेरणी करतो त्या वेळेस जवळीक राज्य हे द्वेष व कुट नीतीने माणूस जातीला काळिमा फासते.
आज देखील संपूर्ण देशाची जबाबदारी महाराष्ट्र पेलत आहे. जर कुणाला शंका वाटत असेल तर त्याने अगोधार अभ्यास करावा नंतर बोलावे. कारण आज समजामध्ये बोलणारे पोपट भरपूर आहेत व त्यांचे काम देखील बोलेण्या पुरतेच आहे. ज्या व्यक्तींचा अभ्यास हा दांडगा आहे. त्यांनाच मराठी व महाराष्ट्र समजला आहे. आज पावोत देशाची महाराष्ट्र भूख भागवत आहे व तसेच व्याधी वरती उपचार देखील प्रदान करत आहे. रोजगार, सुरक्षा, शांतता, पर्यावरण, मानवता, अश्या असंखे सुविधा महाराष्ट्र प्रदान करत आहे.
मराठी अशी भाषा आहे जी आपणास गोडवा प्रदान करते. मराठी हि भाषा इंडो युरोपिय कुळातील एक भाषा मानली जाते. हि भाषा फक्त महाराष्ट्राची नाही तर ती गोवा राज्याची देखील अधिकृत भाषा आहे. भाषा वार प्रांत रचना हि याचसाठी आहे कि आपण आपली अस्मिता व भाषा जपली पाहिजे.
प्रत्येक राष्ट्र हे आज आपली भाषाची अस्मिता जपत आहे. यात युरोपियन देश असो वा चीन किंवा रशिया आपली भाषा कशी टिकेल यावर लक्ष केंद्रित करत आहेत. तर वाचकहो मी तुम्हाला इतिहास व भविष्य या बद्दल सांगणार नसून वर्तमान हेच भाषा जपण्याचे माध्यम आहे तर यथा शक्ती मराठी बोला त्याचा अभिमान ठेवा कि मी मराठी आहे.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.